SHARE

Spiritually soothing song. Listen first (even if you don’t know marathi). And then read the subtitles.

त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का ?
त्या प्रकाशी तारकांच्या ओतिसी तू तेज का ?
त्या नभांच्या नीलरंगी हो‍उनीया गीत का ?
गात वायूच्या स्वरांने सांग तू आहेस का ?

मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का ?
वादळाच्या सागराचे घोर ते तू रूप का ?
जीवनी या वर्षणारा तू कृपेचा मेघ का ?
आसमंती नाचणारी तू विजेची रेघ का ?

जीवनी संजीवनी तू, माउलीचे दूध का ?
कष्टणार्‍या बांधवांच्या रंगसी नेत्रात का ?
मूर्त तू मानव्य का रे बालकांचे हास्य का ?
या इथे अन्‌ त्या तिथे रे, सांग तू आहेस का ?

LEAVE A REPLY